द्वेषपूर्ण भाषण प्रतिबंधक विधेयक राज्यपालांनी फेटाळल्यानंतर विजापूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, राजभवन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा थेट आरोप केला आहे.

विजापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना एम. बी. पाटील यांनी आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. द्वेषपूर्ण भाषणे रोखण्याचे विधेयक एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. आपल्याच जिल्ह्यात काही नेते अहोरात्र केवळ समाजात द्वेष पसरेल अशीच विधाने करत असतात, अशा शब्दांत त्यांनी यत्नाळ यांच्या कार्यशैलीचा समाचार घेतला. कोहळा चोर म्हटल्यावर खांदा शिवशिवतो, अशी त्यांची अवस्था झाल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. राज्यपालांकडून यापेक्षा वेगळी कोणतीही अपेक्षा करता येत नाही, अशी प्रतिक्रिया एम. बी. पाटील यांनी दिली.



Recent Comments