बेळगाव शहरातील समर्थनगर परिसरात असलेल्या सर्वे क्रमांक ४०३/१ आणि ४०३/२ मध्ये बेकायदेशीर ले-आउट विकसित केले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. कोणत्याही सरकारी परवानगीविना याठिकाणी झाडांची कत्तल करून नाल्याकाठी रस्ता तयार करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.


टीचर्स कॉलनी आणि बाडीवाले कॉलनीतील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनधिकृत ले-आउटच्या कामामुळे नाल्याची रुंदी कमालीची कमी झाली आहे. यामुळे पावसाळ्यात सांडपाणी आणि पावसाचे पाणी लगतच्या घरांमध्ये शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.


विशेष म्हणजे, यासंदर्भात एप्रिल २०२५ मध्येच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म भूमिकेमुळे भूमाफियांचे फावले असून, पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची स्थानिकांची भावना आहे. हे बेकायदेशीर ले-आउट तात्काळ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.


Recent Comments