गेल्या वीस वर्षांपासून बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाकडून (बुडा) एकाही लेआउटची निर्मिती झालेली नाही. मास्टर प्लॅनच्या नावाखाली प्राधिकरणाने संपूर्ण दुर्लक्ष केले असून, यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते विजयकुमार पाटील यांनी केला आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजयकुमार पाटील यांनी बुडाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या गुंठ्याचे दर लाखांच्या घरात पोहोचले असून सामान्यांना घरे घेणे कठीण झाले आहे. प्राधिकरणाने आपली जबाबदारी झटकल्यामुळे नागरिकांची मोठी लूट होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, टाऊन प्लॅनिंगचा नकाशा या महिन्याच्या २८ तारखेपर्यंत प्रसिद्ध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ‘बुडा’ने प्रलंबित असलेले सर्व लेआउट्स तातडीने मार्गी लावावेत. जर २८ फेब्रुवारीपर्यंत निर्णय झाला नाही, तर आपण उपोषणाला बसू असा इशारा विजयकुमार पाटील यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला जुनेद पाशा, शब्बीर मुल्ला, रिजवान मकानदार यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments