बागलकोट जिल्ह्यातील इळकल तालुक्यातील गोरबाळ गावाच्या शिवारात असलेल्या एका विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवक हा मुद्देबिहाळ येथील रहिवासी असून त्याच्या मृत्यूबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

अजय सिद्धप्पा वालीकार (२८, रा. अमरगोळ, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गोरबाळ गावाच्या बाहेरील एका सिमेंट वीट कारखान्यात कामाला होता. विहिरीत मृतदेह तरंगताना दिसताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला. इळकल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजयचा मृत्यू अपघाताने विहिरीत पडल्यामुळे झाला की यामागे काही घातपात आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.


Recent Comments