DEATH

निवृत्त प्राध्यापक एफ. बी. पाटील यांचे निधन

Share

बेळगावातील कुवेम्पू नगर येथील रहिवासी आणि केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक एफ. बी. पाटील यांचे आज निधन झाले. निधनसमयी ते ७२ वर्षांचे होते.

प्राध्यापक एफ. बी. पाटील यांनी लिंगराज महाविद्यालयात उपप्राचार्य आणि एनसीसी अधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे विद्यार्थी वर्गात ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: