Belagavi

कॅम्प परिसरात मृत गायीवर हिंदू शास्त्रानुसार अंत्यसंस्कार

Share

बेळगावमधील कॅम्प परिसरात एका गायीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि गोरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत गायीवर हिंदू शास्त्रानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

अवधूत तुडवेकर, संतोष दरेकर, गोरक्षक निलेश पाटील, स्वयं पाटील, ओमकार सावंत, निखिल सावंत, राजू टक्कर, मायकल पिंटो, आधी आणि भूमिराज या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अंत्यसंस्काराचे कार्य पार पडले. यावेळी घटनास्थळी पोलीस आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत हिंदू धर्मसंस्कृतीतील विधींनुसार गायीचे अंत्यसंस्कार केले. मुक्या प्राण्याबद्दल दाखवलेल्या या कृतज्ञतेमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे सर्वच स्तरांतून या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

Tags: