Belagavi

सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना ‘अदानी समूहा’चा मदतीचा हात

Share

बेळगाव तालुक्यातील बामणवाडी गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ‘अदानी समूहा’च्या वतीने शैक्षणिक आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवण्यात आले.

शाळेतील सुमारे २५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात ‘अदानी समूहा’चे कर्मचारी सहभागी झाले होते. श्रीनिवास शाली यांनी विजय मोरे यांच्याशी संपर्क साधून या भेटवस्तू खरेदी करण्याची जबाबदारी घेतली आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या वेळी अॅलन विजय मोरे आणि नीलेश गावडे उपस्थित होते आणि त्यांनी वितरण कार्यात सहकार्य केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या ‘अदानी समूहा’च्या या सामाजिक जबाबदारीचे शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Tags: