राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ ला २०२५ मध्ये १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात नोव्हेंबर २०२५ पासून २०२६ पर्यंत विविध कार्यक्रमांनी हे वर्ष साजरे करण्यात येत आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने आमदार अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

देशभक्त राजन वाघेला यांनी आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आमदार पाटलांचा सत्कार केला. त्यांना भारत मातेचे चित्र असलेले छायाचित्र देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कार स्वीकारल्यानंतर आमदार अभय पाटील यांनी या सन्मानाबद्दल सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, नगरसेवक नंदकुमार मिरजकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments