यल्लम्मा डोंगरावर असलेल्या यल्लम्मा देवस्थान विकास प्राधिकरणाच्या सचिवपदी बेळगाव बीम्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सिद्दू हुळ्ळोळी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “यल्लम्मा डोंगरावर काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून, स्थानिक आमदारांच्या सहकार्याने प्राधिकरणाला विकासाच्या दिशेने घेऊन जाईन.”

“हे दक्षिण भारतातील सर्वाधिक भाविक भेट देणारे धार्मिक क्षेत्र आहे. येथे तन, मन, धनाने देवीला भक्ती अर्पण करणारे भक्त आहेत. त्यांना सोबत घेऊन डोंगरावर विकासकामे केली जातील. तसेच, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल,डोंगरावर येणाऱ्या भाविकांचे हित जपण्याचे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी प्राधिकरणाचे उपसचिव नागरत्ना चोळीन, अधीक्षक शितल कडट्टी, डी.आर. चव्हाण, भरमू हुळ्ळोळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments