प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रतिभा आणि एक चैतन्य लपलेले असते. महिलांनी कोणत्याही कारणास्तव आपले स्वत्व सोडू नये, असे मत लघु-पडदा आणि चित्रपट अभिनेत्री सुधा बेळवाडी यांनी बेळगाव येथे व्यक्त केले.


बेळगाव येथील कन्नड भवनमध्ये लिंगायत महिला समाज आणि कन्नड भवन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लघु-पडदा आणि चित्रपट अभिनेत्री सुधा बेळवाडी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बेळगाव कन्नड साहित्य परिषदेच्या अध्यक्षा मंगला मेटगुडे आणि चिकोडी नगरपरिषदेच्या अध्यक्षा वीणा कवटगीमठ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी बोलताना छोटा -पडदा आणि चित्रपट अभिनेत्री सुधा बेळवाडी यांनी सांगितले की, महिलांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या आवडीला दूर करू नये. कितीही अडचणी आल्या तरी आपले स्वत्व आणि छंद कधीही सोडू नये. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत जीवन होते, परंतु आता लग्न करणे आणि मुलांना सांभाळणे हेच एक कठीण काम झाले आहे. अशा परिस्थितीत कोणीही धैर्य गमावू नये. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रतिभा आणि एक चैतन्य लपलेले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुमती हिरेमठ, रक्षा देगीनाळ, सरोजा निशाणदार यांनी विशेष परिश्रम घेतले.


Recent Comments