Belagavi

शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली

Share

शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सीमाभागातील बेळगाव जिल्हा शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वडकगाव येथील मंगाई नगरमधील सोमेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उप-जिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमात उप-शहरप्रमुख प्रवीण तेजम, विठ्ठल उंदरे, अमर कडगावकर, संजय चतूर, मंगेश नागोजिचे, श्रीधर बिर्जे, रमेश कडूळकर, सहदेव रेमानाचे, मंगेश पोटे, शुभम पवार, ज्ञानेश्वर गोंदळी, बाळू भोसले, फकीरा पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: