
श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना, खानापूर यांच्या वतीने सामूहिक श्री महालक्ष्मी पूजा आणि धार्मिक सभेचा कार्यक्रम लोंढा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात संपन्न झाला.
सोमवारी सकाळी महिला वर्गाकडून कुंकुमार्चन करण्यात आले. बाबुराव देसाई यांनी सपत्नीक विधिवत महालक्ष्मी देवीचे पूजन केले. त्यानंतर धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाबुराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या सभेला लोंढा ग्रामपंचायत अध्यक्ष नीळकंठ उसपकर, गणपती नाईक (क्षेत्र योजना अधिकारी, खानापूर), विद्या भूतकी (सामूहिक पूजा कमिटी अध्यक्ष), सिस्टर जेसिंता, सचिन पिंटो, ग्रामपंचायत सदस्य संतोष चितळे, आणि पत्रकार वसंत काळगे हे अतिथी म्हणून उपस्थित होते.
गणपती नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सविता यांनी स्वागत केले. गणपती नाईक यांनी उपस्थित संघाच्या महिलांना योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत हंडी, सलीम पटेल, सविता सावंत, ज्योती पालेकर, संध्या हंडी यांचे आभार मानण्यात आले. आभार सविता यांनी मानले.


Recent Comments