
बेळगावमधील रामतीर्थनगर येथील सुरेश यादव फाउंडेशनच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी सन्मान समारंभ कणबर्गी तलावाजवळ असलेल्या उद्यानात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. त्यांनी सांगितले की, दरवर्षी फाउंडेशन कर्मचाऱ्यांचा घरी जाऊन सन्मान करते, पण यंदा रामतीर्थनगर महापालिकेत समाविष्ट झाल्याने हा कार्यक्रम रहिवाशांसमवेत आयोजित करण्यात आला. “सफाई कर्मचारी आपल्यासारखेच माणूस आहेत,” हे लक्षात घेऊन नागरिकांनी कचरा ओला आणि सुका वेगळा करून द्यावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अडचणीसाठी चोवीस तास आपल्याला संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात नगरसेवक हनुमंत कोंगाळी, तसेच रामतीर्थनगरचे रहिवासी निर्वाणी, सुरेश उर्बीनट्टी, तोरगल, बिडनाळ, शिवानंद नंदगावी, खोत, विलास केरूर, ताहीर, अप्पया कोलकार, राचय्या मठपती, चरंतीमठ, कुमटेकर, संतोष मेरेकर, केंपन्ना आणि रामतीर्थनगरचे नागरिक उपस्थित होते.


Recent Comments