Chikkodi

खास. जारकीहोळींच्या हस्ते ब्लॉक काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन

Share

चिकोडी येथील नूतन नागरमुन्नोळी ब्लॉक काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर माध्यमांशी बोलताना प्रियांका जारकीहोळी यांनी, “नागरमुन्नोळी ब्लॉक काँग्रेस कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. हे कार्यालय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरेल, तसेच पक्षसंघटनेसाठीही त्याची मदत होईल,” असे म्हटले. केपीसीसी सचिव महावीर मोहिते यांना पक्षामध्ये चांगले स्थान मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी, “रायबाग विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांसाठी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे,” असे सांगितले. हुक्केरी, रायबाग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड यासह सर्व विधानसभा मतदारसंघांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

केपीसीसी सचिव महावीर मोहिते यांनी, “लोकांच्या कामांसाठी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी हे कार्यालय बांधण्यात आले आहे, तसेच पक्षसंघटन हेच या कार्यालयाचे उद्दिष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी लक्ष्मणराव चिंगळे, सिद्धप्पा मर्याई, शिवू पाटील, एच. एस. नसलापुरे, प्रभाकर कोरे, राजू कोटगी, शंकरगौडा पाटील, रमेश पाटील, निर्मला पाटील, गणेश मोहिते, श्याम रेवडे, संतोष नवले, दिलीप जमादार, अर्जुन बंडगर, सुरेश घरबुडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: