Belagavi

बेळगाव जिल्हा स्कूल गेम्स रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५

Share

सार्वजनिक शिक्षण विभाग, बेळगाव आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्कूल गेम्स जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी २०२५’ बेळगावच्या शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.

या चॅम्पियनशिपमध्ये ४० हून अधिक स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी डीपीओ जुनैद पटेल, सुभाष गंभीर, एस.बी. कुडची, एस.ए. मंडलिक, एस.ए. सिद्धनवर, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ यल्लूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, ऋषिकेश पसाले, प्रसन्ना वाणी, सक्षम जाधव यांच्यासह खेळाडू आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात अवनीश कामनवरने ३ सुवर्ण, आशिष अंगडीकरने २ सुवर्ण, रजनीश राजपुरोहितने १ रौप्य आणि अक्षय अरुणकुमारने १ कांस्यपदक जिंकले. तर, १४ वर्षांखालील मुलींच्या गटात अन्वी सोनारने २ सुवर्ण, आराध्या पी ने २ सुवर्ण, प्रतीक्षा वाघेलने १ सुवर्ण, १ रौप्य, पूर्वी शिवशिंपीने १ रौप्य, अनुष्का राजणवरने २ कांस्य आणि आदिती साळोखेने ३ रौप्यपदके पटकावली.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात ऋत्विक दुब्बाशीने २ सुवर्ण, शल्य तरळेकरने २ सुवर्ण, साईराज मेंडकेने १ सुवर्ण, २ रौप्यपदके जिंकली. तर, १७ वर्षांखालील मुलींच्या गटात रश्मिता आंबिगाने ३ सुवर्ण, जान्हवी तेंडूलकरने २ सुवर्ण, साई पाटीलने ३ रौप्य आणि शर्वरी दड्डीकर ने २ रौप्यपदके जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली.

Tags: