Belagavi

बेळगावात ए.आय.आधारित मोफत दंत शिबिराचे यशस्वी आयोजन

Share

पाहि वाईब्स फाउंडेशनने दांता वर्धिनीच्या सहकार्याने हॉटेल नेटिव्ह येथे अत्याधुनिक ए.आय. आधारित मोफत दंत शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात हॉटेलमधील एकूण ४५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन याचा मोठा लाभ घेतला.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. विकास कल्याण सुतार, डॉ. श्रीकांत पुजेरी आणि त्यांच्या दांता वर्धिनीच्या चमूने मोलाचे योगदान दिले.

शिबिरात बोलताना डॉ. विकास यांनी दातांची योग्य निगा राखणे किती महत्त्वाचे आहे यावर भर दिला. ते म्हणाले, “मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यात तोंडाच्या कर्करोगासारख्या आजाराचा धोकाही असतो.”

शिबिराच्या आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या सर्व चमूतील सदस्य, डॉक्टर आणि हॉटेल नेटिव्हच्या कर्मचाऱ्यांचे पाहि वाईब्स फाउंडेशनने मनःपूर्वक आभार मानले . तसेच कर्मचाऱ्यांचे हॉटेल नेटिव्हचे महाव्यवस्थापक सुजित वारनुलकर यांनी शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल फाऊंडेशनने त्यांचे आभार मानले.

Tags: