सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने बेळगावच्या भाग्यनगर येथील कॅनरा बँकेने आर्ष आश्रमातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक मदत केली आहे.

मिझोराम आणि त्रिपुरा येथील आर्ष विद्या केंद्राश्रमातून स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली बेळगावच्या अनगोळ येथील संत मीरा शाळेत शिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी बेळगावच्या भाग्यनगर कॅनरा बँकेने ही शैक्षणिक मदत केली आहे. या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यही पुरवण्यात आले आहे. कॅनरा बँकेच्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत असून, आर्ष आश्रमाने बँकेच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.



Recent Comments