Belagavi

बेळगावमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे उत्साहात आयोजन

Share

बेळगाव शहराला हरित शहर बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन नगरसेवक नितीन जाधव यांनी केले. बेळगावमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. बेळगावच्या टिळकवाडी भागात वृक्षारोपण करून हा दिवस साजरा करण्यात आला.

बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने, प्रभाग क्रमांक २९ मधील टिळकवाडी येथील महात्मा फुले उद्यानात रोपे लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक नितीन जाधव म्हणाले की, पावसाळ्यात सर्वांनी झाडे लावून बेळगावला केवळ स्मार्ट सिटीच नव्हे, तर हरित शहर बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या कार्यक्रमाला आरोग्य निरीक्षक गणाचारी, अनिल तुडयेकर, शाळेच्या शिक्षिका श्रावणी पाटील, अनिता कांबळे, रुपश्री घोडसे, वैशाली पाटील, श्यामला आर. आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: