Belagavi

श्री देवदादा सासनकाठी देवस्थानच्या वतीने वैजनाथ येथे यात्रा

Share

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त पारंपरिक यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या यात्रेत बेळगावमधील चव्हाट गल्लीतील सासनकाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही चव्हाट गल्लीच्या श्री देवदादा सासनकाठी यांच्या पुढाकाराने विशेष पूजा, अभिषेक आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी चव्हाट गल्ली येथून बैलगाड्यांची मिरवणूक निघून देवरवाडीत पोहोचली. त्यानंतर आज सकाळी भाविकांनी सामूहिक अभिषेक व महाआरती करून प्रसाद वाटप केले.

या सोहळ्यात शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन श्रद्धेने पूजा-अर्चा केली. यावेळी सासनकाठीचे पुजारी, चव्हाट गल्ली येथील भाविक तसेच वैजनाथ येथील पुजारी आणि भाविक उपस्थित होते.

Tags: