छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिता राजे बेळगावात दाखल झाले. यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विमानतळावर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

बेळगावातील सांबरा विमानतळावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिता राजे यांचे आगमन झाले. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून संभाजीराजे आणि संयोगिता राजे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सौजन्यपूर्ण संवाद साधण्यात आला.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राजहंसगड येथे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या भव्य शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले होते.


Recent Comments