बेळगाव शहरातील वैभवनगरमध्ये वडिलांनी महागड्या आयफोनच्या खरेदीबद्दल विचारणा केल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बेळगावच्या वैभवनगर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय रशीद शेख या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, रशीदने तब्बल ७० हजार रुपयांचा महागडा आयफोन खरेदी केला होता. हे पाहून त्याच्या वडिलांनी “इतक्या महागड्या फोनची गरज का?” असा प्रश्न विचारला आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांचे बोलणे मनाला लावून घेत रशीदने आपल्या बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments