Belagavi

ग्रामीण भागातील खेळांना अधिक प्रोत्साहन : एम.एल.सी चन्नराज हट्टीहोळी

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी गावातील श्री ब्रह्मलिंग मंदिराच्या प्रांगणात आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातील खेळांना सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिले जाते. केवळ सरकारच नाही तर व्यक्ती आणि लक्ष्मी ताई फाउंडेशनकडूनही खूप मदत केली जात आहे.युवक व बालकांचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे ध्येय आहे. असे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, मनोहर बेळगावकर, नामदेव मोरे, अशोक कांबळे, संतोष कांबळे, शिवाजीराव बोकडे, तानाजी बी, शिवाजीराव राक्षे , मंगल जाधव, प्रकाश बास्कल, कल्लाप्पा बास्कळ, गुरुनाथ पाटील, जयवंत बाळेकुंद्री, बाळू देसुरकर, महेश पाटील, सचिन जाधव, शिवाजीराव मंदार आदी उपस्थित होते.

Tags: