एकीकडे हुक्केरी तालुक्यातील रुस्तुमपूर येथील शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम बंद पाडले तर दुसरीकडे आमचे पाणी आमचे हक्क आंदोलनाची तीव्र करण्यासाठी विविध संघटनांनी आज बेळगावात बैठक घेतली.

हुक्केरी तालुक्यातील रुस्तुमपूर येथील शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम बंद पाडले.

दुसरीकडे बेळगावातील हिडकल जलाशयाचे पाणी धारवाड औद्योगिक क्षेत्रापर्यंत नेण्याच्या कामाच्या विरोधात आमचे पाणी आमचे पाणी आंदोलनाच्या पुढील संघर्षावर चर्चा करण्यासाठी विविध संघटनांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. हिडकल जलाशयातून इतर जिल्ह्याला पुरवठा करण्यापासून रोखण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा प्रभारी मंत्री शशिकांत नायक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुलागुंडा, राजकुमार टोपण्णावर, कर्नाटक रक्षण वेदिकेचे दिपाक गुडगनट्टी, शेतकरी समाजाचे नेते सिद्धगौडा मोदगी आदीं सहभाग होता


Recent Comments