Belagavi

हिरेबागेवाडी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ; ग्रामस्थांचा आरोप

Share

हिरेबागेवाडी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे, असे येथील ग्रामस्थ बापू नावलगट्टी यांनी सांगितले.

मंगळवारी त्यांनी बेळगावात माध्यमांशी संवाद साधला. हिरेबागेवाडीत राणी चन्नम्मा विद्यापीठाची इमारत बांधण्याची कार्यवाही शासनाने केली आहे. मात्र या इमारतीच्या कामाच्या छताला गळती लागली आहे. पुरेसा रस्ता नाही. विधान परिषदेचे सदस्य साबन्ना तलवार यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली मात्र अद्याप दर्जेदार इमारती बांधल्या जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इमारतीचे काम सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. मात्र इमारतीच्या कामाची पाहणी करून , इमारतीच्या छताची दुरुस्ती करून भविष्यात होणारे अनर्थ टाळावेत, अशी मागणी त्यांनी केली.

आता, मंजुनाथ वस्त्रद यांनी सांगितले कि , दशकभराच्या लढ्याचे फलित म्हणून बेळगाव विद्यापीठासाठी राणी चेन्नम्मा विद्यापीठाची घोषणा झाली आणि सरकारने हिरेबागेवाडीजवळ नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इमारतीचे काम पूर्णपणे निकृष्ट असून सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: