बेळगाव जिल्ह्यातील भूतरामनहट्टी भागातील फिनिक्स शाळेत सोमवारी एक विचित्र घटना घडली. शाळेची सुट्टी होण्याच्या वेळेस अचानक शाळेच्या मैदानात ड्रोन पडला. ड्रोन पडताच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ माजला.

ताबडतोब शाळेच्या कर्मचार्यांनी काकती पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ड्रोनची तपासणी केली आणि ते जप्त केले. ड्रोनवर असलेल्या सिरीयल नंबरवरून पोलिसांनी त्याच्या मालकाचा शोध घेतला.
हा ड्रोन एक खाजगी कंपनीचा असल्याचे समोर आले.

काकती पोलिसांनी त्या खाजगी कंपनीला कळवून त्यांचे तपशील घेतले. कंपनीचे कर्मचारी म्हणाले की ते ड्रोन जमिनीच्या सर्व्हे कामासाठी वापरत होते. काकती पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.


Recent Comments