हुक्केरी हिरेमठात नवरात्रीनिमित्त चंडिका होमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांची उपस्थिती होती.


हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत चंडिका होम पार पडला. यावेळी बोलताना बी. वाय. विजयेंद्र यांनी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी हे राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. आज दसरोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याचे ते म्हणाले.

यावेळी आमदार निखिल कत्ती बोलताना म्हणाले, बी वय विजयेंद्र यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी येथे येऊन दर्शन घेतले होते. आता पुन्हा ते दर्शनासाठी आले असून भविष्यात त्यांनी मुख्यमंत्रीस्थान भूषवावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, चेतना अंगडी, रचय्या हिरेमठ, राजेश नेर्ली, हुनश्याळचे निजगुन महास्वामी आदी उपस्थित होते.


Recent Comments