पेन्शनचे पैसे आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी मुलाने आईची हत्या करून नंतर गळफास लावून आत्महत्या केल्याची क्रूर घटना धारवाड शहरात घडली आहे.

आईची हत्या करून मुलाने आत्महत्या केल्याची घटना धारवाड शहरातील होसायल्लापूर वसाहतीतील उडुपी ओणी येथे घडली. शारदा भजंत्री (60) असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. राजेश भजंत्री (40) असे खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. राजेश हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता.
19 हजार रुपये पेन्शनच्या पैशावरून झालेल्या भांडणातून राजेशने आई शारदा भजंत्रीची रॉडने हत्या केली. त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना धारवाड नगर पोलीस ठाण्यात घडली

याबाबत बोलणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले कि , आई शारदा भजंत्री यांच्या पेन्शनच्या 19 हजार रुपयांवर आणि मालमत्तेवर राजेशचा डोळा होता. राजेश , त्याची आई शारदा भजंत्री यांच्याकडे पेन्शनच्या पैशासाठी तसेच रिकामी जागा त्याच्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होता . मात्र शारदा भजंत्री यांनी त्यास नकार दिला . हे दोघे भांडणात मारले गेल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे .


Recent Comments