Dharwad

हिंदू-मुस्लिम विद्यार्थिनींनी श्रीरामाचे गीत गाऊन वेधले लक्ष

Share

अयोध्येत प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार आहे. यानिमित्त देशभरात रामभक्त, कला, संगीतासह विविध प्रकारे आपली भक्ती व्यक्त करत आहेत. पेढानगरी धारवाडमध्येही एका मुस्लिम आणि एका हिंदू विद्यार्थिनीने श्री रामाचे गीत गाऊन ऐक्याचा संदेश दिलाय.

22 जानेवारी अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर, धारवाडमधील जेएसएस स्कूलच्या हिंदू मुस्लिम विद्यार्थिनींनी श्रीरामाचे भक्तिगीत गाऊन लक्ष वेधून घेतले. मुस्लीम विद्यार्थिनी झोया आणि हिंदू विद्यार्थिनी सृजना यांनी श्री रामाची गाणी सुमधुरपणे गाऊन लक्ष वेधून घेतले. श्री राम हे सर्वांसाठी आदर्श असून त्यांची तत्वे सर्वानी आचरण करण्याची गरज आहे, असे धारवाडच्या या विद्यार्थिनींनी सांगितले.

Tags: