DEATH

नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांचे खासगी हॉस्पिटलसमोर आंदोलन

Share

विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरातील एका खासगी रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने , कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये आंदोलन छेडल्याची घटना घडली आहे.

गजकोश हॉस्पिटलमध्ये , सविता धर्मा दशवंत यांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयासमोर आंदोलन केले. दोषींवर कारवाईची मागणी करत त्यांनी संताप व्यक्त केला.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे .

Tags: