Banglore

मंत्री चेलुवरायस्वामी यांच्याविरोधातील पत्राची होणार चौकशी : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

कृषीमंत्री चेलुवरायस्वामी यांच्याविरोधात लिहिलेल्या पत्राची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. निजलिंगप्पा यांच्या पुण्यतिथीचा एक भाग म्हणून आज त्यांनी त्यांच्या पुतळ्याजवळील निजलिंगप्पा यांच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, हे पत्र अस्सल असल्याच्या माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या ट्विटला उत्तर देताना, रामनगराच्या कृषी विभागाचे सहसंचालक अशोक कुमार यांनी पत्र अधिकाऱ्यांनी लिहिलेले नसल्याचे म्हटले आहे. याबाबत तपास करून सत्य उघड करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

बीबीएमपीचे कंत्राटदार बिले मिळत नसल्याने काम थांबवून राज्यपालांची भेट घेत आहेत, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी काम बंद केले नाही. चौकशीसाठी ते राज्यपालांची भेट घेत आहेत. बीबीएमपी, बीडीएमधील कामांची सत्यता जाणून घेण्यासाठी तपास करण्यात येत आहे. यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उडुपी व्हिडिओ प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश काल देण्यात आले. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला चौकशीचे निर्देश दिले होते. पण यापेक्षाही उच्चस्तरीय तपास करण्याचे काम सीआयडीला देण्यात आले आहे. आमदार यशपाल सुवर्ण यांच्या, या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ते सीआयडीकडे तपास देऊ नका म्हणतात. त्यांच्या काळात सीआयडीला दिलेली प्रकरणे बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदर कृषी मंत्री चेलुवराय स्वामी यांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचे प्रकरण चौकशीसाठी पोलिसांकडे सोपवल्याचे सिद्रामय्यांनी सांगितले आहे. आता त्यातील सत्य कधी बाहेर पडते हे पहावे लागेल.

Tags: