Dharwad

नर्सेसना टार्गेट करणारा बनवला व्हिडीओ , दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी

Share

कर्नाटक स्टेट नर्सेस असोसिएशन आणि धारवाड जिल्हा नर्सेस असोसिएशनने कर्नाटक स्टेट नर्सेस असोसिएशन आणि धारवाड डिस्ट्रिक्ट नर्सेस असोसिएशनने वैद्यकीय विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये , एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी , परिचारिकांना लक्ष्य करणारी
इंस्टाग्राम रिल्स तयार करून , कुठलीही परवानगी न घेता हॉस्पिटलमध्ये खूप धिंगाणा घातला होता.

अभिनेता प्रज्वल देवराज अभिनित भद्रा चित्रपटातील नंबेडा नंबेडा या गाण्यावर डान्स केला. गाण्यातुन परिचारिकांवर विश्वास ठेवू नका, असे म्हणत त्यांनी नृत्य केले. याशिवाय किम्सचा वॉर्ड आणि प्रशासनाची इमारत रिल्ससमोर होती.

महेश रेड्डी नावाच्या विद्यार्थ्याच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ जारी केला आहे.
आता हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, विद्यार्थ्यांच्या लहरीपणामुळे चिंतेत असलेल्या किम्स रुग्णालयातील परिचारिकांनी योग्य कारवाईची मागणी केली आहे, किम्सचे संचालक डॉ. रामलिंगप्पा अंटरतानी यांच्याकडे काल तक्रार केली.

व्हिडिओमध्ये परिचारिकांना उद्धट आणि अनादराने वागवले जात आहे. यामुळे परिचारिकांचा अवमान झाला असून, अपमान करणाऱ्या विद्यार्थांना तातडीने शिक्षा व्हावी, अशी मागणी परिचारिकांनी केली.

Tags: