बेळगावातील महावीर भवनात इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे पर्यावरण दिनानिमित्त फ्लॉवर अँड प्लांट शोचे आयोजन करण्यात आले. याचवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीरही घेण्यात आले.

विविध सामाजिक उपक्रमांत अग्रभागी असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंदवाडीतील महावीर भवनात फ्लॉवर अन प्लांट शोचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये पर्यावरण, रोपे, झाडे, निसर्ग याविषयी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. विविध प्रकारची, रंगीबेरंगी, जातिवंत मनमोहक फुले आणि शोभेच्या वनस्पती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. ती पाहताना मन हरखून जात होते. फ्लो
या संदर्भात ‘इन न्यूज-आपली मराठी’ला माहिती देताना इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षा शालिनी चौगुले यांनी सांगितले की, इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे पर्यावरण दिनानिमित्त प्रथमच हा उपक्रम राबवला आहे. घरोघरी फुलझाडे,

शोभेच्या वनस्पती लावण्यास प्रोत्साहन द्यावे, प्रत्येक घरी किमान एक-दोन झाडे लावावीत हा हेतू यामागे आहे. कारण वनस्पती, झाडांमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो. प्राणवायूचे महत्व काय आहे हे आपण कोरोना काळात अनुभवले आहे. या प्रदर्शनात आम्ही नऊ प्रकारात 400हुन अधिक फुलझाडे, रोपे मांडली आहेत. त्याशिवाय पाने आणि पुष्परचना स्पर्धाही घेतली आहे. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले
इव्हेंट चेअरवूमेन संजीवनी सराफ म्हणाल्या की, खासकरून महिलांमध्ये झाडे, रोपांद्वारे पर्यावरण संवर्धनाची जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे. पाने, फुले, झाडे यांना आपण जपतो, पुजतो ही आपली संस्कृती आहे. त्याचे संस्कार महिलांकडून मुलांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने प्रदर्शन भरविले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्याचा लाभ 250 हुन अधिकजणींनी घेतला. एकंदर, पर्यावरण जागृतीसाठी इनरव्हील क्लबचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.


Recent Comments