काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी धारवाड येथील कडप्पा मैदानावर झालेल्या प्रजाध्वनी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शानदार एन्ट्री केली. यावेळी इच्छुक उमेदवारांच्या फलकबाजांना त्यांनी चांगलेच फटकारले.

या मेळाव्याला 10 तिकीट इच्छुकांनी हजारो लोकांची गर्दी केली होती. सिद्धरामय्या मंचावर येताच लोकांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी इच्छुकांचे समर्थक फलक हातात घेऊन तिकीट इच्छुकांच्या बाजूने घोषणा देत असल्याचे पाहून सिद्धरामय्या संतप्त झाले. जर तुम्ही बोर्ड धरला आणि घोषणा दिल्या तर तुम्हाला तिकीट मिळणार का? पाट्या खाली करा असे सांगत फलक लावणाऱ्या इच्छुकांची नावे मी नोंदवून घेईन, असा टोमणा त्यांनी मारला



Recent Comments