कोणी नसल्याचे पाहून पहाटे बसमधून डिझेल चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सकाळ होताच चोरी करण्यासाठी आणलेले दोन कॅन त्या ठिकाणीच टाकून देऊन पळ काढल्याची घटना गोकाक बसस्थानकात घडली आहे.

रात्री गोकाक बसस्थानकात उभ्या असलेल्या चिक्कोडी आगाराच्या बसमधून चोरटे डिझेल चोरण्यासाठी आले होते. उजेड होताच चोरट्यांनी डिझेलने भरलेला कॅन टाकून पलायन केले. या दरम्यान अंदाजे २०० लिटर डिझेल जमिनीवर गळती होऊन वाया गेले. चोरीसाठी वापरलेला पाईप आणि कॅन तेथेच टाकून चोरटयांनी पोबारा केला.
गोकाक आगारात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था तैनात नसल्याने आणि बस आगार व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळेच ही चोरी झाल्याचे येथील बसचालक व प्रवाशांचे म्हणणे आहे.



Recent Comments