राज्य सरकारने शारीरिक शिक्षकांच्या कमतरतेवर मात करून मुलांना तंदुरुस्त करण्यासाठी पावले उचलावीत, असे मत युवा नेते संगमेष बबलेश्वर यांनी व्यक्त केले. विजापूरमधील बीएलडीई वैद्यकीय महाविद्यालयात आयोजिण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

विजापुरात बीएलडीई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्यस्तरीय खो खो स्पर्धेतील विजेत्या संघांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना युवा नेते संगमेष बबलेश्वर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजचे विद्यार्थी हे भारताचे भावी नागरिक आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देण्यासाठी शारीरिक शिक्षकांची कमतरता आहे. शासनाने शारीरिक शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शारीरिक शिक्षकांचे महत्व आणि त्यांचे कार्य याबद्दलही संगमेष बबलेश्वर यांनी प्रतिक्रिया मांडल्या.


बीएलडीई संस्थेचे बी आर पाटील बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच खेळही खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी या दोन्ही गोष्टी परिश्रमपूर्वक केल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंड्या येथील संघाला आणि मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या म्हैसूर येथील संघाला चषक तसेच रोख रुपये १५००० चे पारितोषिक तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या म्हैसूर येथील मुलींच्या आणि मुलांच्या संघाला चषक आणि रोख रुपये १०००० रुपये अशा स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आले. बीएलडीई संस्थेच्या वतीने विजेत्या संघाला चषक आणि विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्यावतीने रोख पारितोषिक देण्यात आले.


Recent Comments