Belagavi

जयतीर्थ मूळ वृंदावनाची बदनामी थांबवा : बेळगावात ब्राह्मण समाजाची निदर्शने

Share

कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम तालुक्यातील कागीना नदीच्या तीरावरील श्री जयतीर्थाच्या मूळ वृंदावनाबद्दल काही लोकांकडून होणारा अपप्रचार थांबवावा आणि तो करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, या मागणीसाठी बेळगावात ब्राह्मण समाजातर्फे आज आंदोलन करण्यात आले.

कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील अणेगोंडी येथील नव वृंदावन येथे रघुवर्य तीर्थाच्या वृंदावनाला जयतीर्थाचे वृंदावन मानून 17, 18 आणि 19 जुलै रोजी पूजा करण्याचा घाट काहींनी घातला आहे. त्याच्या निषेधार्थ आणि सरकारने तो हाणून पाडावा बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी आज गुरुवारी निदर्शने केली. यावेळी बोलताना प्रमोदाचार्य कट्टी म्हणाले, टिकाचार्यांचे वृंदावन मूळखेड येथे आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र, तरीही त्यावर वाद का निर्माण केला गेला हे कळू शकलेले नाही. यावर वाद घालणे थांबवले पाहिजे आणि शतकानुशतकांच्या परंपरा आणि लोकांच्या श्रद्धा स्वीकारल्या पाहिजेत. हा वाद अधिक गंभीर होण्यापूर्वी सरकारने हस्तक्षेप करायला हवा. मूळखेडवरून विनाकारण वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मूळखेड येथे मध्व परंपरेतील महान यतींचे वास्तव्य होते हे सर्वज्ञात सत्य आहे. असे असतानाही वाद वाढवणे योग्य नाही. याचा आम्ही निषेध करतो. खोटे सांगून कोणताही इतिहास खरा होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर समीराचार्य पांगरी मूळखेड उत्तरादी मठाचे श्रद्धाकेंद्र आहे. त्याला 600 वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. टिकाचार्यांच्या समाधीला भक्त अनेक वर्षांपासून भेट देतात. अशा वेळी वाद निर्माण करण्यात काहीच अर्थ नाही. सरकारने हा वाद तातडीने मिटवावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनात श्रीनिधी आचार्य, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, शिवनगी, श्रीधर हुक्केरी, राजेंद्र कुलकर्णी, भीमसेन मिर्जी यांच्यासह ब्राह्मण समाजाचे इतर नेतेही सहभागी झाले होते.

Tags: