चिक्कोडी तालुक्यातील चंदूर गावात सरकारच्या क्षीरभाग्य योजनेतील 1 लाख रुपये किंमतीची दूध पावडरची 400 पाकिटे अंकली पोलिसांनी जप्त केली.

चंदूर गावातील इंद्रध्वज डेअरीत बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेली 1 लाख रुपये किंमतीची दूध पावडरची 400 पाकिटे अंकली पोलिसांनी जप्त केली. सरकारच्या क्षीरभाग्य योजनेतील ही पाकिटे असून, ती गावातील इंद्रध्वज डेअरीत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आली होती. ती जप्त करण्यात आली. याबाबत डेअरीचा मालक महेश जिवंधर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी दूध पावडरची पाकिटे कोठून मिळवली, यात कोणकोण सहभागी आहे याचा तपास अंकली पोलीस करत आहेत.



Recent Comments