सरकारच्या तावडीतून मंदिरांना मुक्त करून मंदिराच्या विकासासाठी घेतलेल्या सरकारच्या निर्णयावर तुमकूर सिद्धलिंग मठाचे सिद्धलिंग स्वामी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सरकारी कचाट्यातून देवस्थानांना मुक्त करून देवस्थानात जमा होणारा महसूल देवस्थानांच्या विकासासाठी वापरण्यात यावा, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत तुमकूर सिद्धलिंग मठाचे सिद्धलिंग स्वामी यांनी व्यक्त केले आहे. देवस्थानातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मंदिराच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी वापर करून भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही स्वामींनी केल्या.

याचप्रमाणे धर्मांतर बंदी कायद्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, कायदा सर्वांसाठी एक असला पाहिजे. प्रत्येकाचे काही सिद्धांत असतात. त्या सिद्धांतानुसार आपण काम केले पाहिजे. यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही, असे स्वामी म्हणाले.
सरकारी कचाट्यातून मंदिरांना मुक्त करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे स्वामींनी म्हटले आहे. आता पुढील काळात सरकार आणखी कोणते निर्णय घेईल, हे पाहावे लागेल.


Recent Comments