Belagavi

बसवण्णा यांचे विचार आत्मसात करण्याची गरज : आ. सतीश जारकीहोळी

Share

बसवण्णा यांचे विचार आणखी उच्च पातळीवर जाण्यासाठी आपण सर्वानी ते आत्मसात करून जगलेवागले पाहिजे असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी मांडले.

बेळगावातील शिवबसव नगरात रविवारी लिंगैक्य शिवबायव्वा आणि बसवन्नेप्पा गुडस यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गुरु बसवाश्रमाचा उदघाटन समारंभ रविवारी पार पडला. त्यात भाग घेऊन बोलताना सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, क्रांतिवीर बसवण्णा यांनी त्यावेळी स्थापन केलेला लिंगायत धर्म आजही तितकाच श्रेष्ठ आहे. तो आणखी उन्नत करण्याचे काम आश्रमांच्याकडून झाले पाहिजे असे सांगून १२व्या शतकातील लिंगायत धर्माची स्थापना, त्यानंतर शरणांच्या झालेल्या हत्या आदी गोष्टींचा उल्लेख करत त्यांनी इतिहासावर प्रकाशझोत टाकला.

याप्रसंगी गदग तोंटद मठाचे डॉ. सिद्धराम स्वामीजी, बैलूर मठाचे निजगुणानंद स्वामीजी आदी उपस्थित होते.

 

 

Tags: