बेळगावात आयटी–बीटीसह विविध प्रकारचे उद्योग स्थापन करून उत्तर कर्नाटकाचा विकास साधावा या मागणीसाठी विविध कन्नड संघटनांनी बेळगावात रविवारी मोर्चा काढून निदर्शने केली.

बेळगावातील कन्नड साहित्य भवनापासून मोर्चा काढून कन्नड संघटनांनी, बेळगावात आयटी-बीटी कंपन्या स्थापन करून उत्तर कर्नाटकाचा विकास करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे विविध उद्योग स्थापन करून उत्तर कर्नाटक भागाचा विकास करावा अशी मागणी केली. यावेळी बोलताना कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष प्रवीण शेट्टी यांनी, राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे सरकारने बेळगावात आयटी-बीटीसह विविध प्रकारचे उद्योग स्थापन करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

याद्वारे या भागाचा विकास केला पाहिजे. सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करून शेट्टी यांनी, आपले अस्तित्व दाखवण्यासाठी म. ए. समिती काळा दिन पाळत आहे असा दावा त्यांनी केला.


Recent Comments