स्मार्टसिटी योजनेमुळे बेळगाव शहराला आधुनिकतेचा स्पर्श लाभत आहे. त्यामुळे शहराचे रुपडे पालटत आहे. रेल्वे स्थानकासमोरील ‘कारवार‘ किंवा ‘कदंबा‘ बसस्थानक म्हणून ओळखले जाणारे ब्रिटिशकालीन बसस्थानकही आता स्मार्ट बनले असून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

: होय, स्मार्टसिटी योजनेच्या अंलबजावणीत बेळगाव शहर कर्नाटकात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरातील अनेक जुन्या-जीर्ण इमारतींना, आस्थापनांना स्मार्टसिटी योजनेच्या माध्यमातून आधुनिकतेचा परिसस्पर्श लाभत आहे. त्यातूनच बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील ‘कारवार’ किंवा ‘कदंबा’ बसस्थानक म्हणून ओळखले जाणारे ब्रिटिशकालीन बसस्थानकही आता स्मार्ट बनले आहे. ब्रिटिश काळात बेळगाव जिल्ह्यातील खानापूरसह काही तालुके, महाराष्ट्रातील काही गावे आणि गोवा राज्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे खास बसस्थानक उभारण्यात आले होते. आता करोडो रुपये खर्चून अत्याधुनिक सोयी-सुविधांसह त्याचे रुपडे पालटून टाकण्यात आले आहे.

या संदर्भात राज नामक प्रवाशाने सांगितले की, बेळगाव शहरात स्मार्टसिटी योजनेतून अनेक चांगली विकासकामे होत आहेत. याठिकाणी बसस्थानकाची जुनी इमारत होती. पण ती जुनी-जीर्ण झाली होती. त्यामुळे परराज्यातील प्रवाशांना सोयीची ठरत नसल्याने ती पाडून नवी अत्याधुनिक इमारत बांधण्यात आली आहे. तिचे लवकर लोकार्पण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बेळगाव शहरात स्मार्टसिटी योजनेतून नवे रूप ल्यालेल्या या स्मार्ट बसस्थानकाबाबत आमचे प्रतिनिधी राघवेंद्र केलेला वॉल्क थ्रू सादर आहे…


Recent Comments