Belagavi

नव्या शैक्षणिक धोरणाने सर्व त्रुटी, समस्या दूर होतील : प्रा. गंगाधरय्या  

Share

 नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशात व्यवस्थित लागू केल्यास सध्याच्या शिक्षण पद्धतीतील सर्व त्रुटी, समस्या दूर होतील असा विश्वास बेळगावच्या शास्त्रीय कन्नड भाषा अध्ययन केंद्राचे अध्यक्ष प्रा. एस. एम. गंगाधरय्या यांनी व्यक्त केला.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या शास्त्रीय कन्नड भाषा अध्ययन केंद्र आणि विद्यापीठाच्या कन्नड भाषा प्राध्यापक परिषदेतर्फे रविवारी भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये आयोजित ‘पदवी कन्नड अभ्यासक्रम आणि पाठयपुस्तके’ यावर कार्यशाळेत रिसोर्स पर्सन म्हणून ते बोलत होते. प्रा. एस. एम. गंगाधरय्या पुढे म्हणाले, कस्तुरीरंगन यांनी अपार कष्ट घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० तयार केले आहे. कर्नाटकचे ४ ज्येष्ठ वैज्ञानिक या समितीत आहेत. त्यामुळे कर्नाटकातच हे धोरण सर्वप्रथम अवलंबण्यात यावे या उद्देशाने त्याची अमलबजावणी करण्यात येत आहे. दूरदृष्टी ठेवून हे धोरण राबविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. आरसीयू कन्नड भाषा प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. आय. बिरादार अध्यक्षस्थानी होते. बी. के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील, डॉ. व्ही. एस. माळी, डॉ. एच. आय. तिम्मापुर, डॉ. राजशेखर पट्टेद, डॉ. कृष्णा मेळवंकी, डॉ. संगमनाथ लोकापूर, डॉ. सुरेश हनगंडी, प्रा. विजयमाला नागनूर आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: