बेळगावातील रामतीर्थ नगरातील कर्नाटक पब्लिक स्कुलमध्ये विविध संघांचे आ. अनिल बेनके यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.

रामतीर्थ नगरातील कर्नाटक पब्लिक स्कुलमध्ये विध्यार्थ्यांसाठीच्या विविध संघांचे आ. अनिल बेनके यांनी उदघाटन केले. तसेच रोटरी क्लब बेळगाव उत्तर आणि समाजसेवक सुरेश यादव यांच्या देणगीतून उभारलेल्या ४ शौचालयांचे यादव यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सुरेश यादव म्हणाले, सरकारी शाळांच्या विकासासाठी सर्वानी हातभार लावला पाहिजे. आमदारांच्या सहकार्याने या शाळेला शहरातील स्मार्ट शाळा बनविण्यासाठी प्रयत्न करूया असे त्यांनी सांगितले. 

यावरी रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष अभयकुमार, नूतन नगरसेवक हणमंत कोंगाली यांचा सत्कार करण्यात आला. शहर गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, मुख्याध्यापक आय. डी. हिरेमठ, एस. ए. किवडसन्नवर, एन. आर. मेलवणकी, एच. ए. मुल्ला, एम. एस. वाली, एम. वाय. कटकोळ, एम. एस. तुरमुरी आदी उपस्थित होते.


Recent Comments