उसाला प्रतिटन ३७०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी नेगीलयोगी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी बैलहोंगल येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासमोर निदर्शने केली.

होय, यंदाच्या ऊस गाळप हंगामाची उलटगणती सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस पाठवायची तयारी सुरु केली आहे. साखर कारखान्यांनीही गाळपाची सगळी तयारी केली आहे. मात्र उसाला यंदा प्रतिटन ३७०० रुपये दर दिल्याशिवाय कारखाना सुरु करू नये अशी भूमिका नेगीलयोगी शेतकरी संघाने केली आहे. या मागणीसाठी संघाच्या सदस्यांनी शनिवारी सोमेश्वर साखर कारखान्यासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी निदर्शकांसमोर बोलताना नेगीलयोगी शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील म्हणाले, सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या वर्षी अगदी कमी २३०० रु प्रतिटन दर दिला होता. अलीकडेच बाकी १०० रु दिले आहेत. आणखी ३०० रु बिल द्यायचे आहे. यंदा प्रतिटन ३७०० रु दर देऊनच गळीत हंगाम सुरु करावा अशी मागणी त्यांनी केली.
दुसऱ्या शेतकरी नेत्यांनी सांगितले की, कारखाना चालवण्यात उसविकास अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांची भूमिका महत्वाची असते. आम्ही पै न पै जमा करून हा कारखाना उभारला आहे. मात्र आम्हालाच काही विचारायचा अधिकार उरला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पाठवलेल्या उसाला योग्य दर दिलेला नाही. शेतकऱ्यांना सी ग्रेड साखर देण्यात येते हे चुकीचे आहे. त्यांना ए ग्रेड साखरच दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
निदर्शनात नेगीलयोगी शेतकरी संघाचे पदाधिकारी इराप्पा हल्लीगेरी, मल्लय्या पुजेरी, गंगन्ना शिंध्री, संजू मादर, राजू तोलगी, संगप्पा सवटगी आदींनी भाग घेतला.


Recent Comments