Belagavi

संजय पाटील यांच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

Share

बेळगाव ग्रामीणच्या . लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात माजी . संजय पाटील यांनी केलेल्या अवमानास्पद वक्तव्याचा सर्व थरातून व्यापक निषेध होत आहे. संजय पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने तर शड्डूच ठोकला असून, संजय पाटील यांची प्रतिमा जाळून निषेध केला आहे.

होय, माजी आ. संजय पाटील यांनी ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात केलेल्या अवमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसतर्फे सोमवारी तीव्र निषेध करण्यात आला. बेळगावातील चन्नम्मा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महिलांविषयी अत्यंत हीन पातळीवर जात वक्तव्य केल्याने संजय पाटील यांच्या धिक्काराच्या घोषणा देत निदर्शने केली. यावेळी संजय पाटील यांचे छायाचित्र पेटवून देऊन त्यांचा निषेध करण्यात आला.

निदर्शनात अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाग घेतला. एकंदर संजय पाटलांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून हा वाद भविष्यात कोणते वळण घेतो हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

 

 

Tags: