ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत माजी आ. संजय पाटील यांनी अवमानास्पद वक्तव्य केल्यानंतर आता पंचमसाली समुदाय आ. हेब्बाळकर यांच्या समर्थनार्थ उतरला आहे. संजय पाटील यांनी आ. हेब्बाळकर यांची माफी मागावी अशी मागणी पंचमसाली समुदायाच्या जिल्हा शाखेने केली आहे.

होय, संजय पाटील यांनी आ. हेब्बाळकर यांच्या विरोधात अवमानास्पद वक्तव्य केल्यानंतर आ. हेब्बाळकर यांनी त्यावर पलटवार केला आहे. त्यांचे पुत्र मृणाल, बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनीही पाटील याना प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच काय काँग्रेसनेही आपल्या आमदारांच्या बाजूने उभे रहात पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आता पंचमसाली समुदाय आ. हेब्बाळकर यांच्या समर्थनार्थ उतरला आहे. बेळगावात रविवारी पत्रकार परिषद घेऊन बोलताना समुदायाचे जिल्हाध्यक्ष आर. के. पाटील यांनी सांगितले की, माजी आ. संजय पाटील यांनी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अवहेलना करणारे असहनीय विधान केले आहे. त्याचा लिंगायत पंचमसाली समाज तीव्र निषेध करत आहे.

राजकीय मुद्यांवरून काहीही टीका केली तर चालेल, परंतु वैयक्तिक पातळीवर खालच्या दर्जाची टीका केल्याने आमच्या समाजाच्या महिलांची बदनामी झाली आहे. त्याबद्दल संजय पाटील यांनी आ. हेब्बाळकर यांची माफी मागावी अन्यथा समाजातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. बाईट पंचमसाली समाजाचे शहराध्यक्ष राजू मगदूम यांनी, यापुढे संजय पाटील यांनी आ. हेब्बाळकर यांच्या विरोधात अशीच टीका सुरु ठेवली तर राज्यभरात पंचमसाली समाजातर्फे संजय पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. बाईट यावेळी पंचमसाली समुदायाचे नेते ऍड. शिवपुत्र फटकल, दरेप्पा ठकण्णावर, रामनगौडा पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments