ज्ञानदीप एज्युकेशनल ट्रस्टचे माजी अध्यक्ष शेवंतीलाल शहा यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ट्रस्टच्या जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम हायस्कुलमध्ये नवीन ध्वजस्तंभाचे लोकार्पण केले.

होय, बेळगावातील प्रख्यात समाजसेवक आणि विविध सामाजिक, सहकारी संघ-संस्थांचे संचालक असलेल्या सेवंतीलाल शहा यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण करून ८६व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त त्यांनी जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम हायस्कुलमध्ये नवीन ध्वजस्तंभाचे लोकार्पण केले. याप्रसंगी ज्ञानदीप एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास अणवेकर, व्ही. एन. जोशी, प्राचार्या डॉ. नवीना शेट्टीगार, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.




Recent Comments