संपूर्ण देशातच प्रथमच खास दिव्यांगांसाठी बेळगावातील टिळकवाडीत उभारलेल्या उद्यानाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले.

होय, बेळगावात सुमारे २२०० दिव्यांग, अपंग मुले आहेत. आत्ममग्न, गतिमंद मुलांना सार्वजनिक उद्यानात नेल्यावर त्यांच्या पालकांमध्ये खजीलतेची भावना निर्माण होते. म्हणून तज्ज्ञांशी चर्चा करून खास दिव्यांग मुलांसाठी बेळगावातील टिळकवाडीत विशेष उद्यान निर्माण करण्यात आले आहे. सामान्य मुलांप्रमाणेच दिव्यांग मुलांनाही निसर्गाचा आनंद लुटता यावा, उद्यानात मनसोक्त खेळण्याचा आनंद घेता यावा यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी उदघाटन केले.
याप्रसंगी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, वनमंत्री उमेश कत्ती, नगरविकास मंत्री बसवराज भैरत्ती, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments