कथेतील सृजनशीलता ही मनाचे प्रतिबिंब असते. रोजच्या जीवनाचे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य असे विचार पुणे येथील बसव अध्ययन केंद्राचे अध्यक्ष डॉ. शशिकांत पट्टण यांनी मांडले.

बेळगावातील कन्नड साहित्य भवनात शुक्रवारी बेळगाव जिल्हा लेखिका संघातर्फे यशोदाबाई कागती दत्तीनिधी कार्यक्रम आणि राजनंदा घार्गी यांच्या ‘अवांतर’ या कृतीचा प्रकाशन सोहळा आयोजित केले होता. त्यावेळी ‘अवांतर’ या कृतीचे प्रकाशन करून बोलताना डॉ. शशिकांत पट्टण म्हणाले, रोजच्या जीवनातील घटना-घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते. जोवर साहित्यिक आहे तोवर इतिहास निर्माण होतच राहतो. कन्नड कथांमधील कथावस्तू पात्रे, प्रसंग पाश्चात्य कथांच्या तोडीस तोड आहेत. आजच्या मोबाईल युगात भाषा, साहित्याचा अभ्यास कमी होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
साहित्यिक निर्मला बट्ट्ल यांनी कृतीचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा लेखिका संघाच्या अध्यक्ष डॉ. हेमावती सोंनोळी होत्या. जिल्हा केंद्र ग्रंथालयाचे उपसंचालक जी. रामय्या, दत्तीनिधी कार्यक्रमाच्या पुरस्कर्त्या व साहित्यिक राजनंदा घार्गी, ज्येष्ठ साहित्यिक एल. एस. शास्त्री, रत्नप्रभा बेल्लद, हमिदा बेगम देसाई, आशा यमकनमर्डी, इंदिरा मोटेबेन्नूर, सुनंदा एम्मी, एम. वाय. मेनसिनकाई, शिवानंद तल्लुर, नारायण घार्गी आदी उपस्थित होते.


Recent Comments