Vijayapura

प्रेमविवाह करूनही तिने केला विश्वासघात; पतीची आत्महत्या

Share

प्रेमविवाह केलेल्या पत्नीनेच दुसऱ्याशी सूत जमवून पळून गेल्याने निराश झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली.

विजापूर जिल्ह्यातील तालिकोटी तालुक्यातील बोम्मनहळ्ळी येथील २५ वर्षीय वेंकटेश द्वारनहळ्ळी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. वेंकटेशाचा नुकताच प्रेमविवाह झाला होता. मात्र त्याच्या पत्नीचे घराशेजारील त्याच्या नात्यातच असलेल्या श्रीशैल नामक युवकाशी सूत जुळले. त्यानंतर ती श्रीशैलसोबत पळून गेली. पत्नीने केलेल्या या विश्वासघाताने वेंकटेशला जबर मानसिक धक्का बसला आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्याने तालिकोतो पोलीस ठाण्यात फिर्यादही नोंदवली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या पत्नीलाही बोलावून विचारणा केली. त्यावर तिने वेंकटेशसोबत राहणार नाही, प्रियकर श्रीशैल सोबतच राहणार असे सांगितल्याने वेंकटेश दुःखी झाला होता. त्या दुःखाच्या भरातच त्याने फेसबुक लाईव्ह सुरु करून ‘माझ्या आत्महत्येला श्रीशैलच जबाबदार आहे’ असे सांगत गळफास घेतला. फेसबुक लाईव्ह पाहिलेल्या स्थानिकांनी त्याला तातडीने तालिकोटी इस्पितळात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात तालिकोटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

 

 

Tags: